Class 8 – Marathi Chapter 5 - घाटात घाट वरंधाघाट
1. आकृती पूर्ण करा.
उत्तर:पावसाळा सुरू झाल्याच्या लेखकाला जाणवणाऱ्या खुणा:1. सोसाट्याचा वारा
2. मातीचा सुगंध
अ. जिगरबाज भटके – वरंधा घाटात बघावयास मिळणारे निसर्गाचे विहंगम दृश्य व टपऱ्यांवर मिळणारा राजेशाही खाना यांबरोबर कावळ्या किल्ला वरंधा घाटात सज्ज आहे. मात्र ह्या किल्ल्यावर ट्रेक करताना अरूंद पायवाट, अरूंद सपाटी, उतरण-चढणीचा रस्ता हृदयाची धडधड वाढवतो. डेअरिंग करणाऱ्या, न घाबरता ट्रेक करणाऱ्या प्रवाशांना जिगरबाज भटके म्हटले आहे.
आ. रंगिली पायवाट – श्री वाघजाई मंदिराच्याबरोबर वरच्या भागात डोंगरमाथ्याजवळ असणाऱ्या टाक्या काळ्याशार पाषाणात खोदलेल्या आहेत. या टाक्यांच्या पाण्यामुळे तेथील पायवाट ओली झाली आहे. त्यामुळे त्या ओल्या वाटेने जाताना घसरून पडल्यामुळे वा चिखल अंगावर उडाल्यामुळे कपडे रंगतात. म्हणूनच या पायवाटेला रंगिली पायवाट म्हणतात.
इ. डोंगराची सोंड – उंच डोंगराच्या माथ्यावरील शेवटच्या टप्प्याला डोंगराची सोंड असे म्हणतात.
4. तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
प्रश्न अ. वरंधा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दांत वर्णन करा.
उत्तर:
वरंधा घाटातील निसर्गाची वेगळीच जादू बघायला मिळते. वरंधा घाटातून दिसणारे निसर्गाचे दृश्य अतिशय विलोभनीय असते. हिरव्यागार झाडांनी भरलेल्या कपारीतून धबधबे जोरदार आवाज करत वाहत असतात. दरीतील हिरवे रान डोळ्यांना सुखद गारवा देते. डोंगरावर ढग उतरल्यामुळे ढगांवर पांढरे आच्छादन घातल्यासारखे वाटते. पावसाची संततधार वातावरणात उत्साह निर्माण करते, धबधब्यांमधून वाहणाऱ्या पाण्याचा जोर जास्त असल्याने ते पाणी जणू दगडांवर चाबूक मारत पुढे जात असल्यासारखे वाटते. निसर्गाचे हे सुंदर दृश्य नजरेचे पारणे फेडून टाकते.
प्रश्न आ. कावळ्या किल्ला
उत्तर:
कावळ्या किल्ला – वरंधा घाटातल्या डोंगरमाथ्याजवळील नऊ टाक्यांच्या समूहापासून ओल्या पायवाटेने पुन्हा एकदा डांबरी रस्त्यावर आल्यावर उजव्या हाताची पायवाट कावळ्या किल्लाकडे जाते, बांधीव पायऱ्या पार करून अरूंद पायवाटेने कारवीच्या झाडीतून कावळ्या किल्ल्यावर ट्रेक सुरू होतो. वरंधा घाटाच्या उत्तरेत पसरलेल्या डोंगरावरून डावीकडे कोकणात उतरत जाणाऱ्या रस्त्यावरून पाय सटकला तर थेट समर्थांच्या शिवथरघळीत माणूस पोहचतो. तेथून पुढे जाणारी अरूंद पायवाट सपाटीवर येऊन थांबते. तिथून एका टेकाडाची उतरण उतरून अखेरची चढाई समोर येते व तेथून वरंधा घाटाचे दर्शन घडते, डोंगराच्या सोंडेला शेवटी जोत्याचे अवशेष व ढासळलेल्या बुरूजाचे अवशेष दिसतात. हा कावळ्या किल्ला जिगरबाज भटक्यांसाठी आवडीचा ठरतो.
खेळूया शब्दांशी.
(A) खाली दिलेल्या विशेष्य आणि विशेषणांच्या जोड्या लावा.
उत्तर:
| विशेषण | विशेष्य |
| 1. विहंगम | दृश्य |
| 2. गरमागरम | कांदाभजी |
| 3. घोंघावणारा | वारा |
| 4. काळाशार | पाषाण |
| 5. अरूंद | पायवाट |
(आ) खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यये ओळखा.
प्रश्न अ. पुण्याहून महाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिरवी झाडी आहे.
उत्तर: शब्दयोगी अव्यये – कडे, वर
प्रश्न आ. चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही.
उत्तर: शब्दयोगी अव्यय – सारखी
प्रश्न इ. जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे.
उत्तर: शब्दयोगी अव्यय – साठी
(इ) खालील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा.
प्रश्न अ. घाटात घाट वरंधाघाट बाकी सब घाटियाँ !
उत्तरः ! – उद्गारवाचक चिन्ह
प्रश्न आ. गतकाळातले ‘ते क्षण’ पुन्हा जिवंत होतात.
उत्तर: ‘_’ एकेरी अवतरण चिन्ह. . पूर्ण विराम.
Comments
Post a Comment